भाग २१: रविवार: चिंतन आणि आढावा - तिसरा आठवडा
कोरोना आधी आपण ठरवलेल्या पुढील ३-५ वर्षाच्या उद्दिष्ट पूर्ती मध्ये काय फरक पडला आहे?
आपले ह्या वर्षीचे उद्दिष्ट काय? ते पूर्ण करण्यासाठी कोणती कृती चालू आहे?
माझी मासिक उत्पन्नाची गरज किती आहे? त्याचे पुढील ध्येय काय? त्यासाठी कोणते मार्ग निवडले आहेत?
नवीन आर्थिक आणि व्यावसायिक व्यवस्था कशी असेल त्याची कल्पना केली आहे का?
तुमच्यावर जे अवलंबून आहेत आणि / किंवा ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात, अशा कुटुंबातील, व्यवसायातील आणि समाजातील व्यक्तीशी आपण बोलून, कोणतीही पुढील योजना ठरवलीत का?
तुमच्या जीवनातील आव्हाने / जबाबदारी पेलण्यासाठी, तुम्ही तुम्हाला योग्य वाटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी बोललात / बोलता का?
अशा आणि इतर विषयांवर तुमची प्रतिक्रिया, सूचना, प्रगती, प्रश्न, शंका मला whatsapp मधून कळवा.
लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.