भाग १४: रविवार: चिंतन आणि आढावा - दुसरा आठवडा

आपण, गेल्या काही भागात उत्पन्नाच्या विविध प्रकारांची माहिती घेतली. अजून ही पुढे घेणार आहोत. त्यात अनेक पद्धती वापरून आपण ३-४ व्यवसाय नक्की करू शकता.

आपण खालील विचारांच्या / प्रश्नांच्या साखळीत अडकत नाही ना, ह्याचा विचार करा आणि आवश्यक कृती करा.

  "लोक काय म्हणतील ?"
  मला ऑनलाईन जमत नाही.
  माझं वय झालंय!
  मी व्यवसाय करू शकत नाही, आमच्या घरी कोणीच केला नाही.
  मला वेळ आणि पैसा खर्च, गुंतवणूक करायची नाही.
  मला वाटतं तेच खरं!
  आता नवीन काही शिकता येणार नाही.
  मी लोकांशी बोलणार, विचारणार नाही.
  मला कोणीच मदत करत नाही.

ह्यातील जास्तीत जास्त विचारातून बाहेर या!

जर पंधरा वर्षे पदवी पर्यंत शिक्षण घेऊन आज आपण नोकरी, व्यवसाय, अर्थार्जन ह्याच्या चिंतेत असू, तर आपण आता अभ्यासत असलेल्या, प्रकारांचे एक आठवड्यापासून ३-६ महिन्याचे शिक्षण घेण्यात, कसली जोखीम आणि अडचण आहे? ते आता आवश्यक नाही का?

आढावा:

  मी सर्व लेख वाचले का?
  मी ब्लॉग बनवला का?
  सांगितलेल्या उद्योग प्रकारात कोणत्या प्रकारात रुची घेतली का? त्या संबंधी कोणाशी बोललो का? त्या विषयीची माहिती , कच्चा आराखडा लिहायला सुरुवात केली का?
  Affiliate marketing ची कोणती वेबसाईट जॉईन केली का?
  विक्री व्यवसायात रस असेल तर, कोणत्या उद्योजकांशी बोललो का?
  मी करत असलेल्या नोकरी, उद्योगाचे भविष्य काय, ह्याची वास्तविक कल्पना मला आली का?


लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.