भाग २८: रविवार: चिंतन आणि आढावा - चवथा आठवडा

  खालील मुद्द्यांच्या आधारे विचार करून आढावा घ्या:

  • ही लेखमाला मिळवण्याचे आपले उद्दीष्ट काय होते? त्या नुसार, त्यातून मला उपयोगी असे काय मिळाले?
  • त्या दृष्टीने आपण ह्यातील कोणत्या पद्धती वापरल्या? त्यातील अडचणी काय आल्या? त्या सोडवल्या का?
  • माझ्या वहीत किती प्रकारांची सविस्तर माहिती, आराखडे, प्रश्न, शंका लिहिल्या आहेत? संबंधित व्यक्तीशी मी त्या विषयी बोललो का?
  • ह्या निमित्ताने मी किती नवीन प्रकारच्या आणि व्यक्तींच्या ओळखी करून घेतल्या? त्यातून मी नवीन काय शिकलो?
  • मला आवश्यक मदत, माहिती मिळत नाही, असे वाटते का? मग, त्यावर मार्ग कसा काढणार?
  • मी ठरवलेल्या, महिन्याच्या उत्पन्नाच्या उद्दिष्टाच्या किती टक्के मी मिळवू शकलो? फरक का आला? त्यावर कोणता उपाय करणार?
  • मी आतापर्यंत, गेल्या महिन्यात, मला माहीत नसलेली कोणती नवीन सवय, कला, गुण, पद्धती, तंत्र, युक्ती शिकलो?
  • मला गरज असलेल्या गोष्टी आणि मला आलेल्या, पण न सुटलेल्या, अडचणी, प्रश्न ह्यांची यादी माझ्याकडे तयार आहे का?
  • आतापर्यंत सांगितलेल्या १४-१५ पद्धतींपैकी मी काही चालू केले का? नसेल, तर का नाही? मला गरज नाही का? मी कुठे अडतोय?

  लक्षात ठेवा, जर तुम्ही आतापर्यंत करत असलेल्या त्याच गोष्टी, तशाच चालू ठेवल्यात, तर तुम्हाला त्यातून तेच परिणाम मिळतील, जे आतापर्यंत मिळत आले आहेत. तुम्हाला हवं ते त्यातून मिळत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहेत. पण, वेगळे किंवा अधिक परिणाम मिळवण्यासाठी वेगळे काही किंवा आहे ते वेगळ्या तऱ्हेने करावे लागेल.


लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.