भाग ७ : रविवार: चिंतन आणि आढावा - पहिला आठवडा
खालील मुद्द्यांवर चिंतन करा:
मला माहित असलेल्या विषयात नोकरी धंदा मिळाला तरच मी करीन, असा तुमचा आग्रह आहे का? तो उद्योग किंवा कामाचा विषय / प्रकार, नवीन अर्थ रचनेत टिकणार आहे का? जर, टिकणार असेल तर, त्यासाठी लागेल तितका वेळ तुम्ही थाबू शकता का?
नवीन कौशल्य, ज्ञान, उद्योग मार्ग मी शिकू शकतो का? कोणत्या मार्गाचा आपण विचार केला आहे?
मी समविचारी नातेवाईक, मित्र वगैरे लोकांच्या संपर्कात आहे का? आम्ही एकमेकांच्या विकासासाठी काय बोलतो? काय करतो? आपण एकत्र येऊन, कसे काम करू शकतो?
आपल्या समस्या, सुचतील त्या कल्पना, महत्वाच्या व्यक्तींचे नंबर, व्यवसाय आराखडा असे सर्व लिहिण्याची वही बनवली का?
आपण पुढाकार घेतो का? नेतृत्व करू शकतो का? प्रकल्प संकल्पना, आराखडा लिहू शकतो का?
मी प्रगतीचे मोजमाप करतो का? कसे?
आपण नुसती काळजी, विचारच करत बसलो का? कृती केली का?
आढावा:
आतापर्यंत पाठवलेल्या भागातून आपण काही सुरू केले का?
ते समजण्यात काही अडचणी आल्या का? त्या विषयी अधिक माहिती, ज्ञान मिळवले का?
तुमच्या स्वतः च्या काही कल्पना आहेत का? त्यावर तुम्हाला काही मदत, मार्गदर्शन हवे आहे का?
लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.