भाग १२: स्वतः वस्तू, पदार्थ, उत्पादन बनवणे

Mode: Off line
Computer Skills needed : NIL
Investment : As per business chosen
Period to learn and master: 1-3 months

आपण आधीच्या लेखात दुसऱ्या उद्योजकाची उत्पादने विकून आपले उत्पन्न कसे मिळवावे, ते पहिले. आता ती किंवा तशी उत्पादने तुम्ही बनवू शकत असाल व तुमची खाली सांगितल्या प्रमाणे तयारी असेल, तर तुम्ही स्वतः एकट्याने, कुटुंबासह किंवा भागीदारीत अशा व्यवसायाला सुरुवात करू शकता.

अशा तऱ्हेच्या उत्पादन व्यवसायाला सुरुवात करताना खालील मुद्द्यांचा विचार करावा :

  • तुमची आवड, ज्ञान, माहिती, अनुभव
  • त्या उत्पादनासाठी ग्राहक, मागणी व त्यातील स्पर्धा
  • जागा, भांडवल,यंत्रे, वीज, गॅस, मनुष्य बळाची आवश्यकता
  • उत्पादन प्रक्रिया,
  • त्यातील वस्तू, इंधन, मेहेनत, वाहतूक खर्च, भाडे वगैरेचा हिशोब
  • सरकारी परवानग्या
  • दर्जा, गुणवत्ता
  • विक्री, वितरणाची व्यवस्था
  • पुढील ३-६ महिन्याचे जमा खर्च अंदाज पत्रक
  • आर्थिक किंवा इतर भागीदार ची आवश्यकता
  • मिळणारा नफा , परतावा

जमा खर्चाचा अंदाज पत्रक बनविण्यात चूक झाली, तर नुकसान होऊ शकते, म्हणून पूर्ण अभ्यास, गणित आणि हिशोब कागदावर बरोबर जमल्यावरच पुढे जावे.

घरातील व्यक्ती आणि मित्र किंवा ह्या व्यवसायातील माहितगार सी ए, ह्यांच्याशी बोलून तुम्ही तुमचा व्यवसाय आराखडा निश्चित करावा.

  खालील उदाहरणावरून आपल्याला कोणते उत्पादन हाती घ्यावे याच्या कल्पना सुचतील :

  • रोजच्या जेवणाचे डबे
  • टिकाऊ पदार्थ लाडू, चकली , चटणी, लोणचेअसे पदार्थ
  • चॉकलेट, केक
  • छोटे कपडे शिवून बनवणे
  • सणावारी लागणाऱ्या वस्तू
  • बॅग, पर्सेस, सौंदर्य प्रसाधने, पिशव्या, पेपर बॅग
  • फिनेल, सनिटायझर, साबण वगैरे रासायनिक उत्पादने
  • उदबत्ती, परफ्यूम, अत्तरे वगैरे
  • आयुर्वेदिक औषधे, पावडरी, टॉनिक वगैरे
  • मुखवास, सुपारी, औषधी किंवा केसाची तेले
  • कॉम्प्युटर टायपिंग, प्रिंटिंग, स्कॅनिंग

ह्या विषयावर बरीच माहिती, माहितीतील उद्योजक आणि इंटरनेट वरून मिळू शकते. गरज आहे ती तुमच्या अढळ उद्दिष्टांची, सखोल अभ्यास, विश्लेषण, निर्णय क्षमता आणि कृतीची! विचार करा, कृती करा.

तुमच्या नवीन उद्योगातील यशासाठी हार्दिक शुभेच्छा!


लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.