भाग १७: शिका आणि कमवा.

प्रकार: कोर्स नुसार
कॉम्प्युटरचे ज्ञान: गरजेनुसार
गुंतवणूक : फी एवढी आणि गरजेनुसार भांडवल
शिकून कमविण्यासाठी वेळ: कोर्स नुसार वेगळा

आतापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या विषयांच्या ज्ञान आणि अनुभवातून जर उद्योग किंवा नोकरीची संधी मिळत नसेल, तर नवीन काही शिकून, ती निर्माण करावी लागेल. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थ आणि समाजव्यवस्था, राहणीमान हे सतत बदलत असल्याने, सतत नवीन शोध, पद्धती, प्रणाली, उद्योग निर्माण होत असतात, त्यामुळे नवीन सतत शिकत राहणे, अर्थार्जनासाठी उपयोगी ठरते.

नवीन व्यवस्थेत, आपलं जुनं शिक्षण, अनुभव कालबाह्य ठरण्याची शक्यता वाढते, त्यामुळे आपल्या नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी आपण स्वतःला नेहमी नवीन काळाबरोबर, विषय, तंत्रज्ञान, पद्धती, दळणवळणाची साधने इत्यादी बाबत अद्ययावत ठेवले पाहिजे. आणि, प्रत्येक वेळी काही ते वेळ काढू आणि खर्चिक नसते. फक्त, आपण आपल्या प्रगती आणि विकासासाठी स्वतः रस घेऊन, थोडा अभ्यास करून, चौकस आणि सतर्क राहून, तो विषय आत्मसात करायची तयारी ठेवायला हवी. नवीन शिक्षण पुस्तकातून, प्रात्यक्षिक सरावाने, शिक्षकाकडून, मित्राकडून, गुगल, यूट्यूब अशा अनेक माध्यमातून विकत किंवा मोफत मिळू शकते.

  नवीन काही शिकण्याचे खालील उपयोग होऊ शकतात:

• नवीन व्यवसाय सुरू करून, काही उत्पादन करून विकणे
• उद्योगाच्या विक्री आणि नफ्यात वाढ करणे
• नोकरीतील पुढील प्रगती करणे किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणे
• स्वतःची किंवा कर्मचारी, सहकाऱ्यांची व्यक्तिगत कौशल्ये, ज्ञान वाढवणे
• नवीन तंत्रज्ञान, प्रणाली, भाषा, समस्या निराकरण पध्दती शिकणे
• आपले छंद विकसित करणे

  कोणता अभ्यासक्रम, विषय, कला, उद्योग शिकावा, हे खालील मुद्यांवरून ठरवता येते:

• तुमची आवड,
• एकाग्रता होण्याची क्षमता
• त्या विषयाची भाषा
• तुमचा स्वभाव
• उपलब्ध आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ
• तुमच्या पुढील संधी, इच्छा, आकांक्षा
• नोकरी करणार कि व्यवसाय
• भांडवल, मनुष्य बळाची आवश्यकता
• तुम्ही शिकत असलेल्या वस्तू, सेवेला भावी मागणी

आताच्या, परिस्थितीत सर्व काही ऑनलाईन होत असल्याने, तुमच्या आवडीचा किंवा गरजेचं कोर्स तुम्ही कुठूनही शिकू शकता. त्यात वेळ आणि पैशाची बचत सुद्धा होते.

खाली काही प्रशिक्षकांची माहिती दिली आहे, त्यातील काही उत्पादन निर्मिती शिकवतात,काही कला शिकवतात, काही आपल्या शारीरिक, मानसिक विकास विषयी शिकवतात. आणि तुमच्याही माहितीत असे अनेक कोर्सेस होत असतील. अशा सर्वांशी बोलून, तुमची रुची आणि त्या विषयाचे भविष्य लक्षात घेऊन कोर्स ची निवड करा. त्या अभ्यास क्रमातून, स्वतःचा विकास कसा करायचा, पुढे व्यवसाय असा उभा करायचा, त्याचेही मार्गदर्शन मिळवा. आणि, त्यानंतर तुमची स्वतःची व्यवसाय उभारणी करा.

अशा काही प्रशिक्षकांची माहिती खाली दिली आहे.

सुदेश देसाई, मुंबई
अन्न प्रक्रिया उद्योग
मोबाईल:. 9223357207

Dr B S Patil, Kalyan
Yog, Pranayam, Stress Mgt, Ayurved Courses
Mob: 98192 15165

Parag Joglekar, Thane
Paragnama
Mob: 9987060270,
Cooking Classes for Indian, Pan Asian, Chinese, Soups, Salads, Starters etc.

Prachi Palsule, Dombivali
Drawing Classes: Hobby, Elementary, Intermediate Exams
Mob: 9819840264

Anthony D'Souza.
Mob: 7768874259
English Speaking and Communication Skills

Pallavi Khopkar, Borivali
Perfume, Soap, Chocolate making classes
Gravies, Sharbat Classes
Mob: 99302 15120

Alka Shah, Pune
Creative Art, Nameplates, frames making
Mob: 9422515705

Girish Dharap, Pune
www.sadagamay.com
Mobile : 9850014576
#Leadership Dev, #Business Growth, #Sales Strategy, #Personal Effectiveness

Aditya Bhagwat, Thane
Astrology, Vastu Classes
Mob: 90295 81590


लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.