भाग ५ : अफीलीयेट मार्केटिंग (भाग २)
कॉम्प्युटरचे ज्ञान : मध्यम
गुंतवणूक : नाही
शिकून कमविण्यासाठी वेळ: १-६ आठवडे
मागील भागात आपण अफीलीएट मार्केटिंग ची ओळख करून घेतली. आता, त्याची थोडी अधिक माहिती आणि अनेक संधींविषयी घेऊ.
लक्षात ठेवा, ट्रॅफिक (म्हणजे तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉगला मिळणारे वाचक) हाच इंटरनेट व्यवसायाचा देव आहे. आणि, तुम्ही बनवत असलेले कंटेंट (मजकूर, चित्रे, व्हिडिओ) हा राजा आहे. तुम्हाला जेव्हा भरपूर visitors हवे असतात, तेव्हा तुम्ही एवढा प्रसार, प्रचार करता कि गूगल ला तुमचा शोध लागतो! आताच्या विषयात, तुम्हाला तुमची affiliate लिंक गूगल वर लोकप्रिय करायची आहे!
ब्लॉग लिहिणे, हे अशाच कामासाठी सुरुवातीपासून सुचवले आहे. तुमच्या आशय, विषयाशी संबंधित महत्वाचे शब्द (key words) वारंवार असलेला मजकूर तुम्ही बनवावा. म्हणजे, ते शब्द शोधणारा वाचक तुमच्या ब्लॉग पर्यंत पोहोचू शकतो. तो तुमच्या ब्लॉग वर आल्यावर, तुमचा मजकूर, लेख, गोष्ट, कविता वाचून, तो त्या संबंधी तुम्ही तिथे ठेवलेली affiliate लिंक ही बघतो आणि तिलाही भेट देऊ शकतो. हे अगदी टीव्ही मालिका प्रमाणे आहे. चांगल्या मालिकेसाठी जास्त प्रेक्षक असतात आणि तिथेच ब्रेक चा माध्यमातून जाहिरातीही दाखवल्या जातात!
म्हणून, तुम्ही विकत असलेले प्रॉडक्ट, सेवा ह्या संबंधी लिखाण करताना त्या विषयीचे key words ठरवा आणि त्याचा वापर तुमच्या मजकुरात ७-८ वेळा करा. त्यामुळे गूगल शोधामध्ये तुमचा ब्लॉग येऊ शकेल, अर्थात अजून अनेक मार्गांनी तुमचा ब्लॉग प्रसारित करणेही, गरजेचे आहे.
सध्या, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी Clickbank, Amazon, Flipkart ह्या पैकी १-२ निवडा. त्यात नोंदणी करून, त्यातील प्रॉडक्ट, सेवांचे प्रकार आणि त्या खाली येणारी प्रॉडक्ट पाहा. शेकडो प्रॉडक्ट चे प्रकार आणि पर्याय आहेत. क्लिकबांक हे डिजिटल प्रॉडक्ट्स विकते, त्याचे कमीशन ८०% पर्यंत सुद्धा असते. अमेझॉन, फ्लिपकार्ट हे घरगुती वापरातील वस्तू पासून, eletronic वस्तु , वस्त्र प्रावरणे, कपडे, पुस्तके इत्यादी हजारो वस्तू विकतात. ते १-१५ टक्के कमिशन देतात.
विषय नुसार अनेक प्रकारचे भरपूर affiliate marketing पर्याय खालीलप्रमाणे आहेत
Mixed product affiliate networks:
Clixgalore.co.in
Vcommission.com
Maxbounty.com
Domain, Hosting related
Godaddy.com
Hostgator.com
Wordpress.com
Bigrock.com
Travel, Hotel, Trips relared
Tripadvisor.com
Travelguru.com
Redbus.com
Yatra.com
Job/placement related
Monster.com
Naukri.com
Fiverr.com
Matrimonial
Shadi.com
Jeevansathi.com
Banking and finance
ICICI bank referral
HDFC Bank affiliate
Religare trading affiliate
Iforex trading
Health related
Medlife.com
Healthkart.com
Educational/Courses
Udemy.com
Coursera.com
आणखीही भरपूर आहेत. पण, सध्या १-२ पर्याय निवडा, त्यावर मजकूर बनवणे आणि प्रचाराची पद्धत, तंत्रे पूर्ण समजून ती वापरणे शिका आणि त्यात यश मिळाल्यावर, फक्त ती पद्धत इतर अनेक प्रॉडक्ट साठी कॉपी करा.
इंटरनेट व्यवसायाची सुंदरता आणि खुबी पाहा. तुमच्या मजकूर आणि affiliate लिंक पर्यंत इंटरनेट वापरकर्ता जग भरातून पोहोचू शकतो, त्याला आवडल्यास तो तुमचे प्रॉडक्ट खरेदी करतो, पैसे देतो, कंपनी त्याला प्रॉडक्ट पोहोचवते, तुमच्या दखल न घेता, तुमच्या अपरोक्ष, तेही २४ x ७ x ३६५. म्हणून, आम्ही म्हणतो, तुमच्या इंटरनेट व्यवसायातून तुम्ही पैसे कमावू शकता, तुम्ही झोपलेले असताना सुद्धा!!
लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.